दुसऱ्या फेरीत सहभागासाठी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 15 जुलै (शनिवार) पासून सुरू झाली. सोमवार (ता. 17) पर्यंत दुसऱ्या फेरीच्या अर्जातील पहिला भाग 885 विद्यार्थ्यांनी व दुसरा भाग 1077 विद्यार्थ्यांनी भरला. परंतु प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या तसेच अर्जातील केवळ भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रक्रियेत सहभागी होता येईल. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे दोन्ही भाग उद्या (ता. 18) शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरून फेरीत सहभागी होता येईल, अशी माहिती अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे देण्यात आली. 

अकरावीची पहिली प्रवेश फेरी शुक्रवारी (ता. 14) पूर्ण झाली. दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलता येतील. पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले नाही तसेच पसंतीक्रमातील दोन ते दहा क्रमांकावरील महाविद्यालय प्रवेशासाठी मिळाले होते, मात्र प्रवेश घेतला नाही, अशांना पसंतीक्रमात बदल करता येणार आहे. पसंतीक्रमात बदल न केल्यास पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे पसंतीक्रम दुसऱ्या फेरीसाठी लागू होणार आहेत. ज्यांना पसंतीक्रम बदलायचे आहेत ते विद्यार्थी स्टुडंट्‌स लॉगीनवर जाऊन बदल करू शकतात. जे विद्यार्थी पसंतीक्रम बदलणार नाहीत त्यांचा पहिलाच अर्ज दुसऱ्या फेरीसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे सहाय्यक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

Web Title: pune news college admission

टॅग्स