अकरावीचे वर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे - दहावीनंतर वेध लागतात ते महाविद्यालयात जाण्याचे. गेल्या एक-दीड महिन्यापासून सुरू असलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग या आठवड्यापासून सुरू झाले आहेत.  

अकरावी प्रवेशाची तिसरी नियमित फेरी या आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र गेल्या आठवड्यात शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये ७० ते ७५ टक्‍के जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात प्रवेश झालेल्या महाविद्यालयांनी मागील आठवड्यात अकरावीचे वर्ग सुरू केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्‌महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संबंधित विषयातील प्रावीण्य, सखोल अभ्यास, सादरीकरण, विश्‍लेषण, संवाद आणि किमान तीन भाषांवरील प्रभुत्व ही कौशल्य प्राप्त केल्यास स्पर्धात्मक युगात यश मिळविता येते. अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे सांगत प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्येही ७५ टक्‍क्‍यांहून अधिक प्रवेश झाले आहेत. मागील आठवड्यात या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सोमवारपासून नियमित अकरावीचे वर्ग सुरू झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी दिली.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत महाविद्यालयांमध्ये ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश झाले असतील, तर अकरावीचे वर्ग सुरू करण्यास हरकत नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे काही महाविद्यालयांनी वर्ग सुरू केल्याचे शिक्षण विभागाला कळविले आहे. 
- मीनाक्षी राऊत,  प्रभारी शिक्षण उपसंचालक

Web Title: pune news college start