स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ‘सरहद’चे केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - सरहद संस्थेच्या वतीने जम्मू काश्‍मीर तसेच ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना केंद्रीय तसेच राज्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षण तसेच मार्गदर्शनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सरहद स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्राचे’ उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. या वेळी सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडकर, दादासाहेब सातव, संजीव खडके, अभय छाजेड, संजीव शहा उपस्थित होते. 

अहिर म्हणाले,‘‘गेल्या ३० वर्षांपासून जम्मू काश्‍मीरमधील जनता एका अशांत आणि अस्थिर कालखंडातून जात आहे. सव्वा कोटी काश्‍मिरी जनतेतील केवळ मूठभर लोक देशविरोधी कारवाया करत आहेत. त्यांची संख्या दोन चार टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही. त्यांचा सामना करणे आणि जनतेला मात्र मुख्य प्रवाहाशी जोडणे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. या पुढाकाराला काश्‍मिरी तरुणांनी आणि जनतेने प्रतिसाद दिला, तर काश्‍मीरचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. मात्र संपूर्ण काश्‍मिरी जनतेला देशविरोधी ठरवणे चुकीचे आहे.’’ सरहद संस्थेने काश्‍मीरमधील युवकांना पुण्यासारख्या शहरात सुरक्षित वातावरण करून दिले आणि मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग केला, याचे अनुभरण देशभर व्हावे, असे सांगून सरहद संस्थेच्या देश जोडणाऱ्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

काश्‍मिरी मुलांना देशभर सुरक्षित वाटावे आणि आपुलकी वाटावी, असे वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्राने ठोस पावले उलचण्याची गरज असल्याचे सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले. 

प्रास्ताविक संजय नहार यांनी, तर जाहीद भट यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

Web Title: pune news Competition Examination