आता स्पर्धा परीक्षांचे यश तुमच्या हातात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पुणे - आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशनने एक अभिनव संकल्पना सादर केली आहे. या संकल्पनेअंतर्गत घरबसल्या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. यासाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशन संयुक्त प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे या तयारीसाठी निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. 

पुणे - आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशनने एक अभिनव संकल्पना सादर केली आहे. या संकल्पनेअंतर्गत घरबसल्या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. यासाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशन संयुक्त प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे या तयारीसाठी निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. 

प्रशासनात अधिकारी व्हायचंय किंवा गावपातळीवरील विविध अधिकारी पदांवर काम करण्याची इच्छा अनेक तरुणांची असते. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेसाठी राज्यभरातून दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी, तलाठी, वन कर्मचारी यांच्यापासून ते निमसरकारी महामंडळे किंवा स्वायत्त संस्थांच्या नोकऱ्यांच्या सरळ सेवा, तर केवळ पोलिस भरतीसाठी सात ते साडेसात लाख तरुण-तरुणी परीक्षा देतात. या परीक्षेच्या कोचिंग क्‍लाससाठी अनेक तरुण ग्रामीण भागाकडून शहराकडे धाव घेतात.   

राज्यात मागील काही वर्षांत प्रशासनात प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंत्रालयीन सहायक, कर सहायक, फौजदार, लिपिक, तलाठी, पोलिस शिपाईपदापर्यंत चुरशीची स्पर्धा सुरू आहे. लाखो परीक्षार्थींच्या गर्दीतून यश आपल्या हातात मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचीही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; मात्र या संस्थांची संख्या शहरी व विकसित असलेल्या निमशहरी भागातच मर्यादित राहिली आहे. या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याची आर्थिक क्षमता असलेल्यांना हा पर्याय सोपा वाटू लागतो; मात्र आवाक्‍याबाहेरच्या खर्चापुढे होऊन लाखो युवक या स्पर्धेसाठीच्या योग्य तयारीपासून मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत शिवनेरी फाउंडेशनने राज्यभरातील विविध जिल्ह्यांचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेचे अचूक मार्गदर्शन साहित्य उपलब्ध न झाल्याने यशाच्या स्पर्धेत मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी फाउंडेशनने ‘व्हिडिओ लेक्‍चर्स डिजिटल नोट्‌स’ची निर्मिती केली. हे तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षेच्या युवकांच्या हातात आता मिळणार आहे. विशेष म्हणजे या डिजिटल नोट्‌स राज्यभरातील विविध आवृत्त्यांमधील सकाळ कार्यालयांतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

डिजिटल नोट्‌स
उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी या राज्यसेवा परीक्षेपासून तलाठी, वनसेवेची सरळ सेवा भरती ते पोलिस शिपाई, लिपिकापर्यंतच्या परीक्षेचा अभ्यासक्रम या नोट्‌समध्ये असेल.

साधारणतः फक्त २०० तासांचा अभ्यासक्रम. ज्याद्वारे तुम्हाला त्या-त्या स्पर्धा परीक्षेचे सर्व घटकांवरील परिपूर्ण साहित्य उपलब्ध होईल.

विविध परीक्षांमधील संपूर्ण अभ्यासक्रम संकल्पनांसह स्पष्ट करण्यात आल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण होण्यास मदत.

व्हिडिओ लेक्‍चर्समुळे व्हिज्युअलच्या आधारे संकल्पना समजण्यास सुलभ व पुन्हा पुन्हा समजावून घेणेही शक्‍य. त्यामुळे आत्मविश्वासातही वाढ होईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्याही हे तंत्रज्ञान आवाक्‍यात.
हे व्हिडिओ लेक्‍चर्स मोबाईलमधील मेमरी कार्ड तसेच पेनड्राइव्हमध्येही उपलब्ध.

याखेरीज या उपक्रमाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील  प्रत्येक घटकावर स्वतंत्र व परिपूर्ण मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत उपलब्ध करून दिले जाणार.

सहभागी विद्यार्थ्यांची प्रत्येक परीक्षेच्या अगोदर सराव प्रश्नपत्रिकांच्या संचाद्वारे तयारी   मॉक टेस्टचाही उपक्रम.

सहभागी विद्यार्थ्यांना चालू घडामोडींविषयी अद्ययावत माहिती देण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर प्रत्येक आठवड्यास माहिती दिली जाणार. 

तज्ज्ञांच्या पुढाकारातून उपक्रम
सामाजिक बांधिलकी मानून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणात्मक विकासात योगदान देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे, डॉ. चंद्रकांत कणसे, डॉ. सरस्वती कणसे, निवृत्त अपर जिल्हाधिकारी कुंडलिक कारकर, भिवाजी पराड, मनुष्यबळ विकासतज्ज्ञ बाळासाहेब साकोरे, सुहास कोकाटे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणार आहे.

कोणत्या परीक्षांच्या डिजिटल नोट्‌स असतील?
 राज्यसेवा परीक्षा
 फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा
 एसटीआय (विक्रीकर निरीक्षक) परीक्षा
 मंत्रालयीन सहायक (एएसओ) परीक्षा
 कर सहायक (टॅक्‍स असि.) परीक्षा
 तलाठी परीक्षा
 लिपिक भरती परीक्षा
 खात्यांतर्गत फौजदार परीक्षा
हे तंत्रज्ञान कोणा-कोणासाठी? 
 गृहिणी  नोकरदार
 पदवीधर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी.
 परीक्षेच्या तयारीला सुरवात करणारे पदवी परीक्षेतील (बीए, बीकॉम, बीएस्सी) च्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी.

Web Title: pune news competitive exams