सवलतीच्या पासचे आजपासून वितरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीमधील पास योजनेसाठी अर्जस्वीकृती आणि वितरण बुधवारपासून सर्व आगारांत सुरू होणार असल्याचे पीएमपीने कळविले आहे. 

पुणे - पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीमधील पास योजनेसाठी अर्जस्वीकृती आणि वितरण बुधवारपासून सर्व आगारांत सुरू होणार असल्याचे पीएमपीने कळविले आहे. 

पीएमपीतर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या शाळांतील पाचवी ते बारावी आणि खासगी शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्‍के रकमेत प्रवासाचा पास दिला जातो. त्यासाठी संबंधित शाळाप्रमुखांनी महामंडळाच्या आगारांमधून सवलतीमधील पास योजनेचे अर्ज न्यायचे आहेत. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर २५ टक्के रक्कम चलनाद्वारे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या महापालिकेच्या बॅंक खात्यात भरल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना पास मिळणार आहे. पीएमपीतर्फे विद्यार्थ्यांना लवकरच ‘मी कार्ड’चे वाटप करण्यात येणार आहे. हे कार्ड सर्व पास केंद्रांवर येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे. 

Web Title: pune news concession pass distribution