"सर्वधर्मसमभावाची ओळख आताचे सरकार पुसतेय' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - ""सर्वधर्मसमभाव आणि एकात्मता ही या देशाची खरी ओळख आहे. ती ओळख पुसण्याचे काम आताचे सरकार करीत आहे. सर्वांनी एकत्र येऊन त्यास विरोध करण्याबरोबरच ही ओळख कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,'' असे आवाहन कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी रविवारी केले. 

पुणे - ""सर्वधर्मसमभाव आणि एकात्मता ही या देशाची खरी ओळख आहे. ती ओळख पुसण्याचे काम आताचे सरकार करीत आहे. सर्वांनी एकत्र येऊन त्यास विरोध करण्याबरोबरच ही ओळख कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,'' असे आवाहन कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी रविवारी केले. 

महाराष्ट्र युवक कॉंग्रेसच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, भाई जगताप, संग्राम थोपटे, हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, अरविंद शिंदे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

चिदंबरम म्हणाले, ""सहिष्णू भारतामध्ये अनेक वर्षांपासून जातीय सलोख्याची परंपरा राहिली आहे. ख्रिसमस, दिवाळी, ईद यासारख्या सर्वधर्मीय सणांमध्ये नागरिक एकत्र येतात, हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये कधीही बदल करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला नाही. उलट तो जोपासण्याचे काम कॉंग्रेसने केले.'' 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""देशाची असलेली ओळख बदलण्याचा प्रयत्न आताच्या सरकारकडून केला जात आहे. त्याला कधीही यश येणार नाही. ती बदलण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल, तर त्याला रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.'' 

माणिकराव ठाकरे म्हणाले, ""आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला जबाबदार कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.'' अशोक चव्हाण म्हणाले, ""एकता हीच या देशाची ताकद आहे. कोणीही ही ताकद वेगळी करू शकत नाही.'' 

Web Title: pune news congress