कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे -  रस्ते, पदपथ व सांडपाणी वाहिन्यांच्या (ड्रेनेज लाइन) कामांपाठोपाठ कंत्राटी कामगारांच्या नेमणुका करून नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार आपने खिसे भरत आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत काही कामगारांची नावापुरतीच कागदावर हजेरी लावून महिनाकाठी त्यांचा पगारही काढला जातो. यासाठी नगरसेवकांच्या मर्जीतील ठेकेदारांकडूनच कामगारांची भरती करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, क्षेत्रीय कार्यालयांकडील कामे म्हणजे ‘लुटी’चे आगार ठरू लागली आहेत. यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यव होत आहे. 

पुणे -  रस्ते, पदपथ व सांडपाणी वाहिन्यांच्या (ड्रेनेज लाइन) कामांपाठोपाठ कंत्राटी कामगारांच्या नेमणुका करून नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार आपने खिसे भरत आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत काही कामगारांची नावापुरतीच कागदावर हजेरी लावून महिनाकाठी त्यांचा पगारही काढला जातो. यासाठी नगरसेवकांच्या मर्जीतील ठेकेदारांकडूनच कामगारांची भरती करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, क्षेत्रीय कार्यालयांकडील कामे म्हणजे ‘लुटी’चे आगार ठरू लागली आहेत. यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यव होत आहे. 

कामगार घेतानाच कामे करून घेण्याची जबाबदारीही ठेकेदारांकडेच आहे; परंतु तसे होत नसल्याचे एका क्षेत्रीय अधिकाऱ्याने सांगितले; तर महिन्याचा पगार घेऊनदेखील काही कामगार मात्र निम्मा महिनाच काम करीत असतात. त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य विभागांच्या कामांवर परिणाम होत असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.  

क्षेत्रीय कार्यालयांकडे विशेषत: घनकचरा व व्यवस्थापन, अतिक्रमण, आरोग्य, सुरक्षा आणि आकाशचिन्ह विभागांमध्ये कंत्राटी कामगार नेमले आहेत. निविदा काढून सहा महिने ते वर्षभरासाठी त्यांच्या नेमणुका केल्या जातात. त्यातच स्वच्छतेच्या कामांसाठी सर्वाधिक कामगार आहे. मात्र त्यातील बहुतांशी कामगार हे निम्मा वेळ म्हणजे, जेमतेच चार ते पाच तास कामे करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रोजच्या रोज साफसफाई होत नसल्याचेही दिसून येत आहे. 

कामगारांना चार-चार महिने पगार नाही
कामगारांच्या पगारांची संपूर्ण बिले घेऊनही ठेकेदार कामगारांना चार-चार महिने पगार देत नसल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी वारजे क्षेत्रीय कार्यालयाकडील कामगारांना आंदोलनाचा इशाराही दिला. ठेकेदार पगार देत नसल्याने महापालिकेची बदनामी होत असल्याचे दिसून आले; परंतु कामगारांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई होत नाही. काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे.

कामांच्या सुसूत्रीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे सर्वाधिक कंत्राटी कामगार आहेत. त्यातील काही कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, त्यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. सुरक्षा विभागातील कामांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप ते करण्यात आलेले नाही. त्यामुळे सुरक्षा विभागासह काही विभागांकडे जादा कंत्राटी कामगार असल्याची नोंद आहे. त्यामुळे या कामगारांच्या पगारापोटी जादा खर्च होत आहे.

कामगार नेमणूक ठेकेदारांसाठी?
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयात सकाळपासूनच त्यांची कामे सुरू होतात. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष्य नसल्याने कामगार कोणत्याही वेळेत येतात. तसेच दिवसभरात नेमकी कोणती आणि किती कामे करतात, याची पाहणीही अधिकारी करीत नाहीत. त्यामुळे ठेकेदारांकडील कामगारांचा महापालिकेला पुरेसा उपयोग होत नाही. तरीही केवळ ठेकेदारांच्या भल्यासाठी दरवर्षी कोट्यवधरु रुपये खर्च करून कंत्राटी कामगार घेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे.

Web Title: pune news contract workers pmc