नगरसेविका रूक्साना इनामदार यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

प्रभाग क्र. 24/ ब रामटेकडी-सय्यदनगर या प्रभागातून त्या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाला पाठींबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची सभागृहातील सदस्य संख्या कायम राहिली आहे. इतर मागसवर्गीय जातीच्या प्रमाणपत्रास त्यांच्या विरूध्द उमेदवारी लढविलेल्या सारिका शिदे, तान्हाबाई लाकडे, उषा लाकडे यांनी आक्षेप घेतला होता. वासंती नाईक व रियाज छागला यांच्या खंडपिठाने सर्वबाबींना स्थगिती देत इनामदार यांना नगरसेवकपद पुन्हा बहाल केले आहे

हडपसर - नगरसेविका रूक्साना शामसुद्दिन इनामदार यांचे जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र जुलै महिन्यात फेटाळले होते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. त्यानंतर आयुक्त व जातपडताळणी समिती आणि निवडणूक आयोगाला पार्टी करून इनामदार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे कोर्टाने ग्राह्य धरून सर्व निर्णयांना स्थगिती देवून त्यांचे नगरसेवकपद कायम ठेवले.  त्यामुळे इनामदार यांना दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामुळे या प्रभागातील होवू घातलेल्या निवडणूकीची प्रक्रिया थांबली आहे. तसेच सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची त्यांना मुभा मिळाली आहे.  

प्रभाग क्र. 24/ ब रामटेकडी-सय्यदनगर या प्रभागातून त्या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला पाठींबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची सभागृहातील सदस्य संख्या कायम राहिली आहे. इतर मागसवर्गीय जातीच्या प्रमाणपत्रास त्यांच्या विरूध्द उमेदवारी लढविलेल्या सारिका शिदे, तान्हाबाई लाकडे, उषा लाकडे यांनी आक्षेप घेतला होता. वासंती नाईक व रियाज छागला यांच्या खंडपिठाने सर्वबाबींना स्थगिती देत इनामदार यांना नगरसेवकपद पुन्हा बहाल केले आहे. जयेश कोचेटा यांनी त्यांची बाजू मांडली. 

Web Title: pune news: cooperator