विद्यापीठात "ऍनॅलिटिक्‍स'वर सुरू होणार अभ्यासक्रम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "ऍनॅलिटिक्‍स' विषयावरील विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका असे हे अभ्यासक्रम असतील. 

पुणे - विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "ऍनॅलिटिक्‍स' विषयावरील विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका असे हे अभ्यासक्रम असतील. 

त्यासाठी विद्यापीठाने कोलकता येथील एआयएम एज्युकेशनच्या "प्राक्‍सिस बिझनेस स्कूल'शी सामंजस्य करार केला. याबरोबरच विद्यापीठाने "एशिया रिसर्च नेटवर्क-कोरिया'शी सामंजस्य करार केला आहे. विद्यापीठाच्या आवारातून "एशिया रिसर्च नेटवर्क-भारत'चे काम सुरू होईल. त्यामुळे आशिया खंडातील विविध देशांमध्ये संशोधनविषयक देवाणघेवाण सुलभ होणार आहे. तसेच संशोधनाच्या विविध विषयांवर कार्यशाळा, परिषदा, छोटे अभ्यासक्रम, बैठका आयोजित करता येतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे खोलवर आकलन होण्यासाठी संयुक्त संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम आखता येईल. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि एआयएम एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरणप्रीत सिंह, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, एआरएन-कोरियाचे अध्यक्ष प्राध्यापक हुवान ली, डॉ. आदित्य अभ्यंकर, तरुण मलकानी आदी या वेळी उपस्थित होते. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे शक्‍य होणार आहे. त्याद्वारे विविध कंपन्या व व्यवसायांना हवे असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: pune news Courses to be started on "analytics" at the pune university