दुचाकी चोरीप्रकरणी दोन मुले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे - चैन करण्यासाठी महागड्या दुचाकी व गिअरच्या सायकली चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून आणखी तीन गुन्हे घडल्याचे उघडकीस आले आहे. 

अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या १५ दिवसांत दुचाकी व गिअरच्या सायकली चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर पोलिस नाईक प्रमोद मोहिते यांना कमिन्स कंपनीसमोरील परिसरात दोन मुले संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अंबरीष देशमुख, गणेश माने, नवनाथ शिंदे किरण नेवसे यांच्या पथकाने सापळा रचून मुलांना ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेल्या एक दुचाकी व दोन गिअरच्या सायकली जप्त करण्यात आल्या.

Web Title: pune news crime