दोन सराइतांसह ट्रान्स्पोर्ट  व्यावसायिकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे - खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांसह ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाला बेकायदा पिस्तूल विक्रीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून मोटारीसह पाच पिस्तूल आणि 16 काडतुसे असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

नितीन सुधाकर अवचिते (वय 30, रा. हरणेश्‍वरवाडी, वडगाव मावळ), मयूर रामदास सुतार (वय 29, रा. माळीनगर, वडगाव मावळ) आणि सागर बबन गोळे (वय 24, रा. न्यू पनवेल) अशी अटक केलेल्या सराइतांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना मंगळवार (ता. 18) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

अवचिते आणि सुतार हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अवचिते याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्‍टसह चार गुन्हे दाखल आहेत. तर, सुतार याच्यावर खून आणि आर्म ऍक्‍टसह आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपूर्वी ते दोघे खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आले होते. ते पिस्तूल विक्री करण्यासाठी संगमवाडी रस्ता परिसरातील ट्रॅव्हल्स पार्किंगजवळ येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकातील परवेज जमादार यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक संजय दळवी, यशवंत आंब्रे, विनायक पवार यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. 

गोळे याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्याची आणि आरोपींची एका ढाब्यावर जेवण करताना ओळख झाली होती. अवचिते आणि सुतार यांनी गोळे याला तीन गावठी पिस्तूल विकल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: pune news crime