लग्नाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - लग्नाच्या आमिषाने एकाने उच्चशिक्षित तरुणीला 14 लाख रुपयांना लुबाडल्याची घटना समोर आली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - लग्नाच्या आमिषाने एकाने उच्चशिक्षित तरुणीला 14 लाख रुपयांना लुबाडल्याची घटना समोर आली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी तरुणीच्या आईने (वय 60) फिर्याद दिली. फिर्यादी महिला सेवानिवृत्त आहेत. त्यांची मुलगी एमए बीएड असून ती नोकरीस आहे. त्यांनी मुलीच्या विवाहासाठी संकेतस्थळावर नोंदणी केली. त्यावर फिर्यादीने ई-मेल आयडी दिला होता. जून महिन्यात या तरुणीने जेरी टेरी या नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यांनी परस्परांना मोबाईल क्रमांक दिले. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्‌सऍपवर संवाद सुरू झाला. आरोपीने तो इंग्लंडमध्ये नोकरीस असून अभियंता असल्याचे सांगितले. लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी तो भारतात येणार असल्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने तरुणी आणि तिची आई या दोघींना मोबाईलवर कॉल केला. त्याच्या मित्राला दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे 90 हजार पौंड असून ते सोडवण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. त्यावर फिर्यादी महिलेने विविध बॅंकांच्या खात्यावर 14 लाख 25 हजार रुपये भरले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर गुन्हे शाखेत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: pune news crime