89 कोटींचा विक्रीकर बुडविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - गेल्या सात वर्षांपासून राज्य सरकारचा 89 कोटी रुपयांचा विक्रीकर जाणीवपूर्वक बुडविल्याप्रकरणी गाड्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांवर येरवडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी प्रकाश कुलकर्णी (वय 41, वस्तू व सेवाकर भवन, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास विठ्ठल वाळुंज (रेंजहिल्स रस्ता) व वैशाली विठ्ठल वाळुंज यांच्यावर "महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विक्रीकर सहायक आयुक्त आहेत. विलास व वैशाली वाळुंज हे दोघे "लिटल मास्टर ऑटो कास्ट प्रा. लि.'चे संचालक आहेत. ही कंपनी गाड्यांचे सुटे भाग (ऑटो पार्टस्‌) बनविते. या कंपनीने 2010 सालापासून सरकारचा 89 कोटी 24 लाख 793 रुपयांचा विक्रीकर जाणीवपूर्वक बुडविल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: pune news crime