संशयावरून दोघांना मारहाण करणाऱ्यास सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे - पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयावरून दोघांना गंभीर जखमी करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंड ठोठावला.

प्रमोद वाल्मीकराव भगत (वय ३७, रा. धानोरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सुभाष सखाराम परब (रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली होती. जानेवारी २०१५  मध्ये धानोरी येथील चौधरीनगरमध्ये गुन्हा घडला होता. 

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंभटकर यांनी सहा जणांची साक्ष न्यायालयात नोंदविली. फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गोरडे यांनी केला होता. 

फिर्यादी परब हे चौधरीनगर येथे एका संस्थेत ‘फॅब्रिकेशन फिटर’ म्हणून कामाला होता. त्यांचा मित्र ओमप्रकाश ‘हेल्पर’ म्हणून काम करीत होता. या संस्थेच्या शेजारी भगत यांची खोली होती. आरोपी हा दोघांना नेहमी शिवीगाळ करत होता. घटनेच्या एक दिवस आधी फिर्यादी आणि त्याच्या मित्राने भगत याला शिवीगाळ का करतो, असा जाब विचारला. तेव्हा तुम्ही माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहता, तुम्ही काम सोडून जा, असे भगतने सांगितले होते. दुसऱ्या दिवशी आरोपीने या दोघांवर धारदार शस्त्राने वार केले होते.

Web Title: pune news crime