नवीन वाहने चोरणारी टोळी बीडमधून जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे - येथील एका कंपनीच्या गोडाऊनमधून नवीन टेंपो चोरून विकणाऱ्या टोळीला संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने (उत्तर) बीडमधून अटक केली. त्यांच्याकडून चार वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत सुमारे 41 लाख रुपये इतकी आहे. 

रफीक उमर जमादार (रा. परशुरामनगर, चिंचवड), विष्णू भागुजी शिंगाडे (रा. अजंठानगर, निगडी), युनूस शौकत शेख (रा. पाचेगाव, गेवराई, जि. बीड), अक्रम बिस्मिल्ला शेख (रा. संभाजीनगर, जालना), चंद्रकांत सुनील आठवले, शब्बीर मुनीर शेख (दोघे रा. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

रफीक जमादार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात दरोडा आणि वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. शहरात वाहनचोरीचे  प्रमाण वाढल्यामुळे गुन्हे शाखेकडून त्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. आरोपी जमादार आणि शिंगाडे यांनी पिंपरी परिसरातील कंपनीच्या गोडाऊनमधून नवीन टेंपो चोरला आहे. ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ग्राहकाच्या शोधात आहेत, अशी माहिती संघटित गुन्हेगारी विरोधी (उत्तर) पथकातील कर्मचारी हजरत पठाण यांना मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने गेवराई येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी चार वाहने जप्त करत भोसरी, पिंपरी आणि चाकण पोलिस ठाण्यातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले. 

Web Title: pune news crime