प्रेयसीचा हात धरल्याने तीन वर्ष सक्‍तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - रस्त्यावर प्रेयसीचा तिच्या इच्छेविरुद्ध हात धरणे प्रियकराला महागात पडले असून, त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात तीन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला. 

महम्मद शाबीर खान (वय 25, रा. रुपीनगर, निगडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार खटला चालविण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी सहा जणांची साक्ष नोंदविली. 

गुन्ह्याचा प्रकार चिंचवड स्टेशन येथे ऑगस्ट 2015 मध्ये दुपारी दीडच्या सुमारास घडला होता. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांच्या ओळखीचा होता. त्याने या मुलीला चिठ्ठ्या लिहिल्या होत्या, प्रेमसंबंध ठेवले नाही तर वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. घटनेच्या एक दिवस आधी पीडित मुलगी क्‍लासला जात असताना आरोपीने तिला अडविले होते. मुलीने हा प्रकार आई वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी मुलगी क्‍लासला जात असताना आरोपीने तेथे येऊन तिचा हात धरला. हा प्रकार पाठीमागून येणाऱ्या पीडित मुलीच्या आईने पाहिला. तिने त्वरित मुलाला पकडून ठेवले. मुलीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. त्या वेळी आरोपी आणि पीडित मुलीच्या वडिलांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर मुलीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. 

आरोपीने न्यायालयात बचाव करताना पीडित मुलीचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. मुलीने लिहिलेल्या चिठ्ठ्या त्याने सादर केल्या. हा बचाव घोगरे-पाटील यांनी खोडून काढला. पीडित मुलीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध असले तरी इच्छेविरुद्ध या मुलीचा हात रस्त्यात पकडण्याची परवानगी त्याला मिळालेली नाही. त्यामुळे तो दोषी असून, घटनेच्या वेळी तो तेथे असल्याचे त्याने मान्य केल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो मान्य केला. 

Web Title: pune news crime