आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे - पहिलीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गेल्या ऑगस्टपासून सुरू होता. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, अन्य पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने तिच्या वडिलांकडे गुरुवारी पोटात दुखत असल्याची तक्रार केली. वडिलांनी तिला दवाखान्यात नेले असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आजीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य पाच जण हे अल्पवयीन असून, त्यांचे वय 12 ते 14 वर्षे आहे. त्यांची बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, गेल्या ऑगस्टपासून हा प्रकार सुरू होता. शेजारची काही मुले या मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन जात होती. त्याबाबत आजीला संशय होता; पण असे काही घडेल, असे तिला वाटले नव्हते. मुलीनेही अज्ञान आणि भीतीपोटी हा प्रकार कोणाला सांगितला नाही. तिच्या पोटात दुखत असल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार समोर आला.

Web Title: pune news crime