नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे - विकास आराखड्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतच्या मुठा नदीपात्रातील (पूररेषेतील) अतिक्रमणविरोधी कारवाई महापालिका प्रशासनाने हाती घेतली असून, पहिल्या टप्प्यात पत्र्याचे शेड आणि पूररेषेतील भराव काढण्यात आला. त्यानंतर येथील बेकायदा बांधकामे पाडण्यात येणार आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये साधारणत: 50 ट्रक भराव उचलण्यात आला. या कारवाईचा खर्च येथील व्यावसायिकांकडून वसूल केला जाणार आहे.

म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतच्या नदीपात्रात बांधकामे करण्यास बंदी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत, या परिसरात मोठ्या बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच, तात्पुरत्या स्वरूपाचे शेडही उभारण्यात आले आहेत. ही बांधकामे पाडण्याचा आदेश आदेश राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) महापालिका आणि पाटबंधारे खात्याला दिला आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई करण्यात आली नाही; परंतु महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे खात्याच्या पाहणीत नदीपात्रात बेकायदा बांधकामे उभारल्याचे आढळून आले. या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रातील भराव उचलण्याची कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली. मात्र, व्यावसाविकांनी विरोध केल्याने कारवाईत अडथळे आले. महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश बनकर म्हणाले, 'या भागात गेल्या तीन दिवसांत जवळपास 45 ट्रक भराव आणि राडारोडा काढला आहे. काही ठिकाणच्या सीमा भिंतीही काढल्या आहेत. राडारोडा उचल्यानंतर बांधकामे पाडण्यात येतील. येत्या आठ दिवसात ही कारवाई पूर्ण होईल.''

Web Title: pune news crime on encroachment