तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नगरमधील एकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नगरच्या एका तरुणावर मंगळवारी रात्री चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नगरच्या एका तरुणावर मंगळवारी रात्री चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्‍मा रवींद्र गायकवाड (वय 22, मूळ रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील रवींद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. तर, किशोर हनुमंत रणदिवे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रेश्‍मा ही पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात एम.एस्ससी.च्या द्वितीय वर्षात शिकत होती. ती सध्या विद्यापीठातील वसतिगृहात राहत होती. तर, किशोर हा श्रीगोंदा येथे राहत असून, गेल्या तीन वर्षांपासून त्यांची एकमेकांशी ओळख होती. तो तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ऐन वाढदिवसाच्या दिवशीच 15 जानेवारी रोजी दुपारी तिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना तिने मृत्यपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. त्यात किशोर रणदिवे हा तिला त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून मंगळवारी रात्री त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: pune news crime by girl student suicide