तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नगरमधील एकावर गुन्हा  

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नगरमधील एकावर गुन्हा  

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नगरच्या एका तरुणावर मंगळवारी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

रेश्‍मा रवींद्र गायकवाड (वय २२, मूळ रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील रवींद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. तर, किशोर हनुमंत रणदिवे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेश्‍मा ही पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात एम.एस्सी.च्या द्वितीय वर्षात शिकत होती. ती सध्या विद्यापीठातील वसतिगृहात राहत होती. तर, किशोर हा श्रीगोंदा येथे राहत असून, गेल्या तीन वर्षांपासून त्यांची एकमेकांशी ओळख होती. तो तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून वाढदिवसाच्या दिवशीच १५ जानेवारीला तिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने मृत्यपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत किशोर रणदिवे हा तिला त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com