पाच लाख लुटणाऱ्या चोराला नागरिकांकडून चोप

रविंद्र जगधने
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

मनोज प्रल्हाद मुंडे (वय 25, रा. हिबट, ता. मुखेड, नांदेड) असे त्या चोरट्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव विलास गाडेकर (वय 23, रा. राजगुरुनगर) हे कार्यालयात जमा झालेली पाच लाख 34 हजारांची रोकड पंजाब नॅशनल बॅंकेत भरण्यासाठी शुक्रवारी दुपारी घेऊन जात होते.

पिंपरी : हत्याराचा धाक दाखवून पाच लाख 34 हजारांची रोकड पळविणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडले. ही घटना शुक्रवारी (ता. 8) दुपारी तीनच्या सुमारास महापालिकेसमोर असलेल्या कमलाक्रॉस इमारतीमधील पंजाब नॅशनल बॅंकेजवळ घडली. संतप्त झालेल्या नागरिकांनी चोराला चांगला चोप देत पिंपरी पोलिसांच्या हवाली केले. 

मनोज प्रल्हाद मुंडे (वय 25, रा. हिबट, ता. मुखेड, नांदेड) असे त्या चोरट्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव विलास गाडेकर (वय 23, रा. राजगुरुनगर) हे कार्यालयात जमा झालेली पाच लाख 34 हजारांची रोकड पंजाब नॅशनल बॅंकेत भरण्यासाठी शुक्रवारी दुपारी घेऊन जात होते. त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या चोरट्याने ते बॅंकेजवळ आल्यानंतर त्यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळून जाऊ लागला. त्यावेळी गाडेकरांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी चोरट्याला पाठलाग करून पकडून चोप दिला. चोरी करण्यासाठी तिघे आले होते. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे दोघे दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना कळविताच पोलिस घटनास्थळी होऊन मनोजला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे विचारपुस केली असता, त्याने त्याचे दोन साथीदार उनकेश्‍वर पद्‌माकर मुंडे (वय 21, रा. बजरंग बुचडे यांचे घर, मारूंजी, मूळ रा. हिबट) आणि अमोल दिगंबर गिरी (वय 23, रा. कंधार, जि. नांदेड) यांची नावे सांगितली. पोलिसांनी काही वेळात मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. 

Web Title: Pune news crime in pimpri