मोटार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

संदीप घिसे
सोमवार, 26 मार्च 2018

पिंपरी - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराने पादचारी अजित पाटील यांच्या अंगावर मोटार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरे येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह त्याला प्रोत्साहन देणाऱ्या दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

रूपेश दत्तात्रय तावरे आणि राहुल एकनाथ पाटील (दोघेही रा. नेरे ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजित भालचंद्र पाटील असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचे बंधू विशाल भालचंद्र पाटील (वय २७) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तावरे हा सराईत गुन्हेगार आहे. अजित पाटील यांची काही दिवसांपूर्वी आरोपी तावरे आणि राहुल पाटील या दोघांशी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपापसात संगनमत केले. शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अजित पाटील हे रस्त्याने पायी चालले होते. ते दत्तवाडी नेरे येथील एक्झर्बिया सोसायटी जवळ आले असता आरोपी तावरे यांनी त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तावरे याच्या शेजारी बसलेला आरोपी राहुल पाटील हा अजित यांच्या अंगावर मोटार घालण्यासाठी तावरे याला प्रोत्साहन देत होता. या अपघातात जखमी झालेले अजित पाटील हे सध्या बेशुद्ध अवस्थेत असून, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनोहर सोनवणे करीत आहेत.

Web Title: pune news crime rupesh tawre try to kill ajit patil