वारजेत भरदिवसा नऊ लाखांची घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पाल यांचे सोन्या मारुती चौकात गोकूळ भवन येथे दुकान आहे.

पुणे : वारजे येथे भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून कापड व्यापाऱ्याच्या घरातून 8 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश चांदोरा (वय 49, रा. गणपती माथा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ते कापडाचे व्यापारी असून, त्यांचे वारजेत दुकान आहे. शनिवारी दुपारी त्यांच्या घरातील सर्व जण बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूमधील कपाटातून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला.

साडेआठ लाखांचे दागिने लंपास
सराफाकडे काम करणाऱ्या कारागिराने साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेख हसन शेख अब्दुल खलेख अली (वय 27, रा. सोन्या मारुती चौक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अमेयकुमार पाल (वय 25, रा. सोन्या मारुती चौक) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पाल यांचे सोन्या मारुती चौकात गोकूळ भवन येथे दुकान आहे. तेथे अली हा सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत होता. त्यांनी त्याला 285 ग्रॅम सोने दागिने तयार करण्यासाठी दिले होते.

पैसे भरण्याच्या बहाण्याने फसवणूक
एटीएममध्ये पैसे भरत असताना मदत करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी तरुणाची 19 हजारांची फसवणूक करून रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मार्केट यार्ड शाखेत घडली. आईदान गजेसिंह (वय 27, रा. तळजाई पठार, धनकवडी) याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. पुण्यात तो व्यवसाय करतो.

Web Title: pune news crime warje house robbery

टॅग्स