"सायकल चालवा, आयुष्य वाढवा' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - सामाजिक कार्यासाठी आणि आरोग्यदायी संदेश देण्यासाठी रविवारी (ता. 17) सकाळी पुणेकर धावले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात लहान थोरांनी उत्साहात "पुणे सायक्‍लोथॉन'मध्ये सहभाग घेत "सायकल चालवा, आरोग्य टिकवा, आयुष्य वाढवा' हा संदेश दिला. 

पुणे - सामाजिक कार्यासाठी आणि आरोग्यदायी संदेश देण्यासाठी रविवारी (ता. 17) सकाळी पुणेकर धावले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात लहान थोरांनी उत्साहात "पुणे सायक्‍लोथॉन'मध्ये सहभाग घेत "सायकल चालवा, आरोग्य टिकवा, आयुष्य वाढवा' हा संदेश दिला. 

लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स. प. महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे "आठवणींचे पुणे, सायकलींचे पुणे' या संकल्पनेवर आधारित "पुणे सायक्‍लोथॉन' आयोजिली होती. सकाळी सहा वाजता सायक्‍लोथॉनची सुरवात स. प. महाविद्यालय येथून झाली. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, मिसेस युनिव्हर्स स्पर्धेतील विजेती पल्लवी कौशिक उपस्थित होत्या. 22 कि.मी., 12 कि.मी. आणि सात किलोमीटर अशा तीन मार्गांवर ही जनजागृती रॅली काढण्यात आली. सहा ते ऐक्‍यांशी वयोगटातील नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. 

प्राचार्य शेठ म्हणाले, ""सायकल चालविणे ही काळाची गरज आहे. कारण पेट्रोल, डिझेलचे साठे कधीनाकधी संपणार आहेत; परंतु सायकल चालविल्यामुळे नैसर्गिकरीत्या मनुष्याचा व्यायाम होतो आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. त्यामुळे याचा विचार करून सायकल चालवावी.'' 

कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) म्हणाले, ""माझे वय 81 वर्षांचे आहे. मी नेहमी 20 ते 22 किलोमीटर सायकल चालवतो. सायकल चालविल्याने आरोग्य चांगले राहते. तरुण पिढीनेही नेहमी सायकल चालवावी.'' कौशिक म्हणाल्या, ""लहानांपासून थोरांपर्यंत अनेकज ण सायकल रॅलीत सहभागी झाले. हे पासून मनापासून आनंद झाला. मनुष्य तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालविली पाहिजे. सायकल रॅलीमुळे निश्‍चितच तरुणांसहित अनेकांनासुद्धा सायकल चालविण्याची प्रेरणा मिळेल.'' 

Web Title: pune news cycle