पर्यावरण रक्षणासाठी ‘सायक्‍लोथॉन’ रॅली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे - स्मार्ट आणि हरित पुण्यासाठी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करा, असा संदेश देणारी ‘सायक्‍लोथॉन’ सायकल रॅली येत्या रविवारी (ता. ११) होत आहे. स्टारकेन स्पोर्टस्‌ प्रा. लि. आणि रोटरी क्‍लब ऑफ पुणे यांनी ही रॅली आयोजित केली आहे. 

वीस आणि पाच किलोमीटर अशा दोन अंतरासाठी होणाऱ्या या रॅलीला नावाजलेले सायकलपटू आणि सायकलप्रेमी पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार सायकलप्रेमींनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी काही मोजकेच दिवस राहिले असून, जास्तीत जास्त संख्येने पुणेकरांनी या अनोख्या रॅलीत सहभाग घ्यावा, असे आवाहन स्टारकेन स्पोर्टस आणि रोटरी क्‍लब ऑफ पुणे स्मार्ट सिटी यांनी केले आहे.

रविवारी (ता. ११) पहाटे ५.३० वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटजवळून रॅलीला सुरवात होईल. निर्धारित अंतर पार करून रॅली पुन्हा याच ठिकाणी येईल. सर्व सहभागी सायकलप्रेमींना स्टारकेन स्पोर्टस आणि रोटरी क्‍लबतर्फे टी शर्ट व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

नोंदणीसाठी 
 सायक्‍लोथॉनमध्ये भाग घेण्यासाठी https://easebuzz.in/link/BGWGJ या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
 नोंदणी शुल्क रु. ५००
 सायकल हवी असल्यास नोंदणी शुल्क रु. ८००
 ७७७४०६०४५० किंवा ०२०-२६०५८८६६ या क्रमांकावर संपर्क करूनही नोंदणी करता येईल.

Web Title: pune news cyclothon rally

टॅग्स