लेखकांनो, पुस्तकांनाच "द्रोणाचार्य' माना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

पुणे - ""द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून एकलव्याने धनुर्विद्या ग्रहण केली. शौर्य, कौशल्य हस्तगत केले. तसेच लेखकांनी चांगल्या पुस्तकांना समोर ठेवावे. त्यांना गुरू मानावे आणि चांगले लेखन करावे,'' असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी दिला. नुसते कसदार लेखन झाले पाहिजे, असे वारंवार सांगून त्या प्रकारचे लेखन होणार नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, असेही ते म्हणाले. 

डी. वाय. पाटील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयातर्फे "उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा' हे पुस्तक प्रदर्शन आयोजिण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मिरासदार यांनी श्रोत्यांशी मुक्त संवाद साधला. लेखक डॉ. अच्युत गोडबोले, "अक्षरधारा'च्या रसिका राठीवडेकर उपस्थित होत्या. 

प्रा. मिरासदार म्हणाले, ""हल्ली वाचन कमी झाले आहे, असे म्हटले जाते; पण चांगले साहित्य असेल तर लोक आवडीने वाचतात. हे आम्ही अनुभवलेले आहे. चांगले साहित्य, व्याख्यान, कथाकथन, साहित्यविषयक वेगवेगळे उपक्रम यातून लोकांचे वाचन वाढवता येईल. पण त्यांना जे हवे आहे, ते आपण लेखकांनी दिले पाहिजे. गंभीर तर पाहिजेच. विनोदीही लेखन करायला हवे. त्यासाठी साधे-सोपे लिहिता आले पाहिजे. दरवेळी अवघडच लिहिले पाहिजे असे नाही.'' आचार्य अत्रे सभागृह येथे 21 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले असेल. 

कथाकथनाला टाळ्यांची दाद 
रविवारची सकाळ... शाळेला सुटी असल्याने अनेक विद्यार्थी मांडी घालून जमिनीवर बसले होते... पालकांनीही तितकीच गर्दी केली होती... सभागृह गच्च भरल्याने बाहेरील स्क्रीनसमोरही चांगलीच गर्दी जमली... ही सारी लगबग होती, ती द. मा. मिरासदार यांचे कथाकथन ऐकण्यासाठी. "भानाचं भूत' ही कथा आपल्या दमदार आवाजात "दमां'नी सादर केली. या कथेला आणि वयाच्या नव्वदीतील त्यांच्या स्मरणशक्तीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात खास दाद दिली. 

Web Title: pune news D. M. Mirasdar Writer