चॉकलेटच्या बिलावरून पैलवानांकडून तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - चॉकलेटच्या बिलावरून झालेल्या वादातून पहिलवानांनी डी मार्ट मॉलमधील सुरक्षारक्षकांना धक्‍काबुक्‍की करून तेथील साहित्याची तोडफोड केली. ही घटना कात्रज बाह्यवळण रस्त्यावर आंबेगाव येथील डी मार्ट मॉलमध्ये शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी नऊ पैलवानांना अटक केली आहे.

या संदर्भात डी मार्टचे व्यवस्थापक बाबासाहेब पाटील (वय ४८, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलासह दहा पहिलवानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास श्रीरंग भागवत (वय २१), विराज राजेंद्र जोरी (वय २०), ओंकार राजेंद्र खाटपे (वय २०), गणेश बाळासाहेब मोरे (वय २४), हर्षवर्धन बळिराम शेळके (वय २४), प्रकाश बापू पोकळे (वय १९), सागर सोपान कानगुडे (वय १९), आकाश मोहन चौधरी (वय १९), राजवर्धन मनोज वाडकर (वय २१, सर्व रा. कात्रज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

कात्रज येथील कुस्ती संकुलातील हे प्रशिक्षणार्थी पहिलवान शनिवारी रात्री डी मार्टमध्ये गेले होते. तेथे त्यांच्यासमवेत असलेल्या एका मुलाने चॉकलेट खरेदी केले. त्या वेळी बिलावरून वाद झाला. त्यानंतर या पहिलवानांनी सुरक्षारक्षकांना धक्‍काबुक्‍की करून तेथील साहित्याची तोडफोड केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी. वाय. ताटे करीत आहेत.

Web Title: pune news D-Mart crime wrestler