डी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना न्यायालयाच्या परवानगीनंतर ससून सर्वोपचार रुग्णालयातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, त्यांना दम लागत असल्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये "व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले होते; परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या तीन ते चार डॉक्‍टर त्यांची देखरेख करीत आहेत. मंगळवारी (ता. 20) सकाळी आठच्या सुमारास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून सर्व तपासणी अहवाल घेऊन ससून रुग्णालयाच्या "मेडिकल बोर्ड' पुढे नेण्यात येणार आहे. त्यांच्या तपासणीनंतर त्यांना कुठे हलवायचे, याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

Web Title: pune news D S kulkarni