सहाव्या थरांवर फुटल्या हंड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाल्यावर ताशांचा थर्रार अन्‌ टिपरूच्या ठेक्‍यावर ढोल वाजवत पथकांचे वादन... गोविंदा-गोविंदाच्या जयघोषात मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडणारी गोविंदा पथके.... हंडी फुटताच ‘गोविंदा आले रे आला’, ‘शोर मच गया शोर’ या हिंदी-मराठी गाण्यांच्या ठेक्‍यावर थिरकणाऱ्या तरुणाईने गोपाळकाल्याचा मनसोक्त आनंद लुटला. मध्यवर्ती भागातील हंड्या किती थरांवर फुटतात, हे पाहण्यासाठी गोपाळभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सहाव्या थरांवर बहुतांश मंडळांच्या हंड्या फुटल्या.

श्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवारी साजरा झाल्यानंतर गोपाळकाल्याला दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. परंतु, याला छेद देत बहुतांश मंडळांनी जन्मोत्सवाच्या दिवशीच दहीहंडी उत्सव साजरा केला. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरांमध्येही क्रेनवर हंड्या लावल्या होत्या. बहुतांश मंडळांनी स्वातंत्र्यदिनावर आधारित देखावे आणि फुलांची आकर्षक सजावट करून हंड्या बांधल्या होत्या. शनिपार मित्र मंडळाने सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. त्यानंतर नादब्रह्म पथकाने नव्याने बसविलेल्या तालाची सलामी दिली. 

सुवर्णयुग तरुण मंडळाची हंडी भगवा ग्रुपच्या उदय जाधव या गोविंदाने रात्री नऊ वाजता फोडली. तर हुतात्मा बाबुगेनू मंडळाची हंडी रात्री पावणेदहा वाजता शिवतेज ग्रुपचा गोविंदा साहिल मुसळे याने फोडली. हुतात्मा बाबुगेनू मंडळ आणि सुवर्णयुग तरुण मंडळांच्या हंड्या किती थर लावून फुटणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु, उंचावर बांधलेल्या हंड्या खाली घेतल्यावर गोविंदा पथकांनी दोन्ही मंडळांच्या हंड्या सहा थर लावून फोडल्या. मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये विविध चौकांमध्ये हंड्या लावल्या होत्या. 

दहीहंडी उत्सवामुळे दुपारपासूनच स्पिकरच्या भिंती लावून त्यावरच जल्लोषात तरुणाईचे नाचगाणे सुरू होते. किरकोळ घटना वगळता उत्सव आनंदात साजरा झाला. फेसबुक लाइव्हवरही मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. चंदननगर येथे स्वराज्य प्रतिष्ठानने पाण्याचा अपव्यय टाळत दहीहंडी उत्सव साजरा केला. बुधवार पेठेतील वीर हनुमान मित्र मंडळाने लहान मुलांसाठी दहीहंडी कार्यक्रम आयोजिला होता.

Web Title: pune news dahihandi