डावी-उजवीच्या परंपरेतून पेशवेकालीन पंजांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - ‘बारा इमाम की दो चारो दिन’, ‘हजरत मौला अली की दो चारो दिन’, ‘ला इलाह इल्ललाह’, ‘या हुसेन’च्या घोषात मोहरमच्या सातव्या दिवशी शुक्रवार पेठेतील बारा इमाम दर्गा आणि घोरपडे पेठेतील हजरत सय्यद शाहबाबा दर्ग्याच्या (हळदीवाला पंजा) पंजांचा डावी-उजवी हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. दोन्ही पंजांची भेट घडविण्याची प्रथा पेशवेकालीन असून, मुस्लिम धर्मीयांसह सर्वधर्मीय नागरिक त्यात सहभागी झाले होते. 

बारा इमाम दर्गा येथून आणि हजरत सय्यद शाहबाबा दर्गा येथून मिरवणुकीने निघालेले पंजे शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर आले. तेथे दोन्ही पंजांची पारंपरिक पद्धतीने भेट झाली. पंजांचे दर्शन घेण्यासाठी बहुसंख्येने भाविक उपस्थित होते. पंजांचे आगमन होताच उत्साहात स्वागत करण्यात आले.

प्रथेप्रमाणे चौकीसमोर दोन्ही पंजांनी पाच प्रदक्षिणा घातल्या. माजी नगरसेविका मदिना तांबोळी, विजय मारटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

दरवर्षी उत्साहात डावी-उजवीचा कार्यक्रम साजरा होतो. मिरवणुकीत सहभागी नागरिकांचे अन्य धर्मीय नागरिकही स्वागत करतात.
- फारुख सिद्धिकी, प्रमुख, बारा इमाम दर्गा

सर्वधर्मीय नागरिक आवर्जून मिरवणुकीत सहभागी होतात. हे डावी-उजवीचे वैशिष्ट्य आहे.
- मुजावर सलीम बोजगर, हजरत सय्यद शाहबाबा दर्गा

Web Title: pune news davi-ujavi event