वराळेत इंद्रायणीकाठी आढळला मानवी सांगाडा

गणेश बोरुडे
बुधवार, 14 मार्च 2018

प्राथमिक तपासणीअंती सदर सांगाडा साधारणतः ६० ते ७० वयोगटातील वृद्ध व्यक्तीचा असून गेल्या तीन ते सहा महिन्यांपूर्वी मयत झाल्याची असल्याची शक्यता वर्तवत पुढील तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवला आहे

तळेगाव स्टेशन - मावळ तालुक्यातील वराळे गावच्या हद्दीतील स्मशानभूमीलगत इंद्रायणी नदीकाठी मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी वराळे गावचे पोलीस पाटील शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता,स्मशानभूमीच्या शेजारी गवतामध्ये कुजलेल्या अवस्थेतील प्रेताचा सांगाडा आढळून आला.पोलिसांनी तळेगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांना पाचारण केले असता,केवळ कवटी आणि हाडेच शिल्लक राहिलेली दिसली.प्राथमिक तपासणीअंती सदर सांगाडा साधारणतः ६० ते ७० वयोगटातील वृद्ध व्यक्तीचा असून गेल्या तीन ते सहा महिन्यांपूर्वी मयत झाल्याची असल्याची शक्यता वर्तवत पुढील तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान नजीकच्या काळात परिसरात कुठेही कुणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली गेली नसून,सदर सांगाड्याची माहिती इतर पोलीस ठाण्यांना कळविण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिली.देहूरोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर आणि सहायक निरीक्षक साधना पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: pune news: death police