लाखेवाडी ग्रामस्थांची ग्रामपंचायतीची मागणी

युनूस तांबोळी
बुधवार, 6 डिसेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे) शिरूर तालुक्‍यातील मलठण ग्रामपंचायतीमधून लाखेवाडी हे स्वतंत्र विभागणी करून नवीन ग्रामपंचायत करावी, अशी मागणी लाखेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी मलठण ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिले आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे) शिरूर तालुक्‍यातील मलठण ग्रामपंचायतीमधून लाखेवाडी हे स्वतंत्र विभागणी करून नवीन ग्रामपंचायत करावी, अशी मागणी लाखेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी मलठण ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिले आहे.

मलठण हे गाव 5 हजार 736 लोकसंख्येचे मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. मलठण गावठाण, शिंदेवाडी, लाखेवाडी, थोरातवाडी, अमराईवस्ती, दंडवते दरा, कोठावळे वस्ती या परिसराचे मिळून मलठण ग्रामपंचायतीचे काम पाहिले जाते. सन 2011 च्या जनगणनेनुसार लाखेवाडी हे महसुली गाव म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. लाखेवाडीची एकूण लोकसंख्या 1022 आहे. मलठण येथून हे गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. राजकीयदृष्ट्या या परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. डिंभे उजव्या कालव्याच्या पाणी व्यवस्थापनाने हा भाग बागायती झाला आहे. या परिसराजवळच "पराग ऍग्रो' हा खासगी साखर कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यावर विविध विकासकामांना अधिक बळकटी येईल, यासाठी मलठण ग्रामपंचायतीमधून लाखेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी, अशी मागणी येथील उपसरपंच सखाराम मावळे, राणी नरवडे, महादेव मावळे, विक्रम मावळे, चंदर मावळे, चैतन्य पडवळ, दादाभाऊ कदम, बाळकृष्ण काचोळे, जयसिंग कोठावळे या ग्रामस्थांनी केली आहे.

या मागणीसाठी लाखेवाडी येथे 19 डिसेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस. एच. खेडकर यांनी दिली.

जनतेतून सरपंच निवडीचा परीणाम...
2011 च्या जनगणनेनुसार लाखेवाडी हे स्वतंत्र महसुली गाव म्हणून समाविष्ठ झाले होते. तरीदेखील राजकीय हस्तक्षेपातून या गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाला नाही. पुढील येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे आत्तापासून स्वतंत्र गाव झाल्यावर सरपंच पदाचे स्वप्न पुर्ण होण्यास मदत होणार आहे. सरकारने देखील थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचाना अधिक दर्जा देत असल्याने महसुली गावे आता स्वतंत्र होण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: pune news Demand for Gram Panchayat of Lakhewadi Villages