काही मिनिटांत होणार डेंगीच्या तापाचे निदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - लक्षणे दिसताच अगदी काही मिनिटांमध्ये डेंगीच्या तापाचे निदान करणे "डेंगी डे 1 टेस्ट'मुळे शक्‍य झाले आहे. रुग्णाला संसर्ग झालेला विषाणू नेमका प्राथमिक अवस्थेत आहे की तो दुसऱ्या टप्प्यावर पोचला आहे, याची माहितीही यातून अचूक मिळणार आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना रुग्णावर वेळेत, प्रभावी उपचार आणि डेंगीचे व्यवस्थापन करता येईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. डेंगीच्या या निदान चाचणीचा खर्च चार पटीने कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

"इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्‍नॉलाजी'मधील डॉ. नवीन खन्ना यांनी ही "डेंगी डे 1 टेस्ट' विकसित केली आहे. या संशोधनाबद्दल त्यांना "अंजनी माशेलकर इन्क्‍लूसिव्ह ऍवॉर्ड'ने गौरविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 17) केंद्रीय मनुष्यबळ संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. 

डेंगीची लक्षणे दिसू लागल्यानंतर या आजाराच्या अचूक निदानासाठी रुग्णाला काही दिवस वाट पहावी लागते. रक्त तपासणी अहवाल तातडीने मिळत नसल्याने डॉक्‍टरांना लक्षणांवर आधारित उपचार सुरू करावे लागतात. भारतीयांनी केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे डेंगीची चाचणी आता काही मिनिटांमध्ये करता येणार आहे. अत्यंत कमी वेळेत होणाऱ्या डेंगीच्या निदान चाचणीमुळे रुग्णांचा खर्चदेखील कमी होणार आहे. 

डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 50 वर्षांमध्ये ही संख्या 30 पटीने वाढली आहे. पुण्यात डेंगीचा उद्रेक झाल्याचे चित्र दिसत आहे. 

या बाबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ""नावीन्यतेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांचा "अंजनी माशेलकर पुरस्कार'ने गौरव केला जातो.''

Web Title: pune news dengue health

टॅग्स