तीन वर्षांत पहिल्यांदाच डेंगीचे सर्वाधिक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - शहरात गेल्या तीन वर्षांमधील डेंगीचे सर्वाधिक रुग्ण यंदा आढळल्याची माहिती पुढे आली आहे. डासांचे निर्मूलन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे यातून ‘निदान’ झाले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी दिली आहे. यंदा डेंगीने मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

डेंगीच्या तापाने पुणे आजारी पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. एकेका दिवसामध्ये २४ ते ३० डेंगीचे रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरात गेल्या महिन्यात पडलेल्या दमदार पावसाचे पाणी सोसायट्यांच्या परिसरात, मोकळ्या मैदानात पडलेल्या नारळ करवंट्यांमध्ये साचले. त्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. हे डास चावल्याने शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहराच्या सर्व भागांत डेंगीचा हा ताप वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले आहे.  

सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. रुग्णालये, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंगीचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत साडेचार हजार नोटीस बजावल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: pune news dengue patient increase