पुण्याच्या उपमहापौरपदी सिद्धार्थ धेंडे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अर्ज मागे
 

पुणे : पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपकडून सिध्दार्थ धेडे आणि काँग्रेस - राष्ट्रवादीकडून लता राजगुरु हे होते. मात्र बुधवारी निवडणुकीवेळी लता राजगुरू यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होत सिध्दार्थ धेंडे विजयी झाले.

उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे महिनाभरापूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे उपमहापौरपद हे रिक्त झाले होते. तर या पार्श्वभूमीवर आज महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता राजगुरू या उपमहापौरपदासाठी उमेदवार होत्या.

या निवडणुकीवेळी पीठासीन आधिकारी लहुराज माळी यांनी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ दिली होती.तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सिध्दार्थ धेंडे यांची उपमहापौर पदी बिन विरोध निवड झाल्याचे पीठासीन आधिकायानी घोषित केले.
या निवडणुकीला महापौर मुक्ता टिळक,अतिरिक्त आयुक्त शितल उगले,पीठासीन आधिकारी लहुराज माळी आणि सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते.

Web Title: pune news deputy mayor elect siddharth dhende