‘शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणांमुळे प्रगती’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘छत्रपती शाहू महाराज यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठे व क्रांतिकारी निर्णय घेतले. त्या धोरणांमुळेच बहुजन समाजाच्या प्रगती व विकासाचा मार्ग मोकळा झाला,’’ असे मत संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्य कर्तृत्वाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, मयूर शिरोळे, जितेंद्र साळुंके, ज्योतिबा नरवडे, सिद्धार्थ कोंढाळकर आदी उपस्थित होते.

पासलकर म्हणाले, ‘‘शाहू महाराज यांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. त्यापैकी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. या निर्णयाद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात महाराजांनी घेतलेले निर्णय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे, लवचिक आणि वास्तववादी होते.’’

Web Title: pune news development by shahu maharaj educational policy