''तंटामुक्त विश्वस्त संस्थां'साठी डिजीटायझेशन ही काळाची गरज'

यशपाल सोनकांबळे
बुधवार, 24 मे 2017

काही अपप्रवृत्ती गैरसमज पसरवुन संस्था खाईत घालतात. त्यासाठी स्वच्छ, पारदर्शक आणि कायदेशीर कारभारासाठी सर्व व्यवहार ऑनलाईन केले पाहीजे. जेणेकरुन तंटामुक्त विश्वस्त संस्थेचे धोरण प्रत्यक्षात उतरेल. यापुढे सर्व संस्थांच्या विश्वस्तांनी ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन संस्थांचे व्यवहार ऑनलाइन करावेत.

पुणे - धर्मादाय विश्वस्त संस्थामधील सर्व व्यवहार आणि प्रशासन पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया आवश्यक आहे. 'तंटामुक्त विश्वस्त संस्थे'चे धोरण प्रत्यक्षात उतरविण्यासाठी डिजीटायझेशन करणे ही काळाची गरज आहे, असे मत राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी बुधवारी व्यक्त केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित धर्मादाय ऑनलाइन प्रक्रियेच्या परिचयात्मक कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे, खासदार अनिल शिरोळेे, मनोज वाडेकर, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते. पी. ई. सोसायटीचे कार्यवाह श्यामकांत देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले.

यावेळी आयुक्त सावळे म्हणाले, "धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि विश्वस्त संस्था यांचे कायदेशीर नाते आहे. या संस्थांचे नेतृत्व धर्मादाय आयुक्त करत असतात. विश्वस्त बदलतात परंतु संस्था बदलत नसते. काही अपप्रवृत्ती गैरसमज पसरवुन संस्था खाईत घालतात. त्यासाठी स्वच्छ, पारदर्शक आणि कायदेशीर कारभारासाठी सर्व व्यवहार ऑनलाईन केले पाहीजे. जेणेकरुन तंटामुक्त विश्वस्त संस्थेचे धोरण प्रत्यक्षात उतरेल. यापुढे सर्व संस्थांच्या विश्वस्तांनी ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन संस्थांचे व्यवहार ऑनलाइन करावेत. ज्यांना संस्था चालविणे अशक्य असेल त्यांनी संस्थांचे विलीनीकरण किंवा अनोंदणीकरण करावेत." असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी वकिल एड.मनोज वाडेकर, अधिकारी कांचन जाधव यांनी प्रत्यक्ष संगणकावर सर्व ऑनलाइन प्रक्रियेचे सादरीकरण केले. कार्यशाळेपुर्वी प्रस्ताविक आणि आभारप्रदर्शन गजानन एकबोटे यांनी केले तर सुत्रसंचालन ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

धर्मादाय संस्थांना औद्योगिक स्वरुप - राज्य धर्मादाय आयुक्त सावळे
देशात एकुण 35 लाख विश्वस्त संस्था आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडे आठ लाख संस्था आहेत. त्यांचे ई रेकॉर्ड, सुची एक डाटा एन्ट्री, चेंज रिपोर्ट, लेखापरिक्षण, स्थावर, जंगम मालमत्ता संरक्षण, अनोंदणीकरण अशा सुविधा संकेतस्थळावर करणे बंधनकारक आहे. धर्मादाय संस्था केवळ निधीसंकलनापुरती मर्यादित नसुन याला औद्योगिकतेचे स्वरुप येत आहे. यातुन रोजगार निर्मिती, वैद्यकिय उपचार अशा संधी निर्माण होत आहे.
- शशिकांत सावळे, राज्याचे धर्मादाय आयुक्त

ई सकाळवरील ताज्या बातम्या ः
स्वतःला घडवण्याच्या वृत्तीतून तरुणाची दमदार वाटचाल
"समृद्धी नाही, हा तर बरबादी महामार्ग'
पाकमध्ये अडकलेली महिला भारतात परतणार...
आज शाहिरांना रडावे लागतेय: बाबासाहेब पुरंदरे
सेक्‍स रॅकेट चालवित असल्याच्या संशयावरून महिलेला अटक

Web Title: Pune news digitization is important for institutions says Shashikant Salve