पाणीपुरवठ्यासाठी केंद्राकडून निधी आणू - कांबळे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे - पुणे कॅंटोन्मेट बोर्डाच्या हद्दीतील दोन प्रभागांतील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी आणला जाईल. महापालिकेच्या सहकार्याने पुढील आठ दिवसांत पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात येईल, असे समाजकल्याण राज्यमंत्री  दिलीप कांबळे यांनी बुधवारी सांगितले. 

पुणे - पुणे कॅंटोन्मेट बोर्डाच्या हद्दीतील दोन प्रभागांतील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी आणला जाईल. महापालिकेच्या सहकार्याने पुढील आठ दिवसांत पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात येईल, असे समाजकल्याण राज्यमंत्री  दिलीप कांबळे यांनी बुधवारी सांगितले. 

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मात्र, महापालिकेसंदर्भातील प्रश्‍नांबाबत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. त्यानंतर कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. 

कांबळे म्हणाले, ""बोर्डाच्या हद्दीतील जलवाहिन्या जुन्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत दोष निर्माण होतात. परिणामी, या भागातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. महापालिकेच्या सहकार्याने बोर्डाच्या हद्दीतील पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्या नव्याने टाकण्याचे नियोजन आहे. त्याच्या कामाचा अहवाल महापालिकेने तयार करावा.'' 

""घोरपडी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम प्रलंबित आहे. ते सुरू करता येईल. येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍नही सोडवू,'' असे कुणाल कुमार यांनी सांगितले. 

पुणे महापालिकेनेही या कामासाठी आणखी एक कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली असून, याबाबत मोहोळ म्हणाले, ""लुल्लानगर येथील उड्डाण पुलाच्या कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही.'' 

रेसकोर्स-रामटेकडी उड्डाण पुलास मंजुरी 
सोलापूर रस्त्यावर फातिमानगर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेसकोर्स येथील पोलिस चौकीपासून रामटेकडी येथील रेल्वे उड्डाण पुलापर्यंत उड्डाण पूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोलापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेने या पुलाच्या कामाचे नियोजन करण्याची सूचना आयुक्तांना केल्याचेही कांबळे यांनी सांगितले. 

Web Title: pune news dilip kamble water pune cantoment board