आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा

आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’च्या वतीने ‘पीडीएनएस’ परिषदेचे आयोजन

पुणे - जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान हिंदी महासागर व आग्नेय आशियाकडे सरकत असतानाच इस्लामिक दहशतवाद व चीनकडून राबविण्यात येत असलेले आक्रमक परराष्ट्र धोरण, या दोन घटकांचा प्रभाव वाढतो आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधूनही ही दोन मोठी आव्हाने आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्‍युरिटी (पीडीएनएस)’ या परराष्ट्र धोरण व व्यूहात्मक राजकारणतज्ज्ञांच्या उच्चस्तरीय परिषदेमध्ये विविध संवेदनशील जागतिक आव्हानांवर चर्चा केली जाणार आहे. येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. परिषदेच्या निरोप सत्रास जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा हे उपस्थित राहणार आहेत. 

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’च्या वतीने आयोजित केलेल्या या परिषदेसाठी ‘सकाळ माध्यम समूह’ माध्यम प्रायोजक आहे.

परिषदेमध्ये ‘बदलत्या व अस्थिर जागतिक राजकारणामधील भारताचे स्थान’, ‘भारत व उदयोन्मुख चीन’ या विषयांसह अन्य विषयांवर चर्चा होईल. परिषदेत अफगाणिस्तानमधील सरकारचे माजी सल्लागार श्रीनिवास सोहोनी, जागतिक पातळीवरील प्रसिद्ध पत्रकार-लेखक फरीद झकारिया, गुप्तचर विभागाचे माजी संचालक प्रद्योत हलदार, माजी राज्यसभा सदस्य मौलाना मेहमूद मदानी, माजी सनदी अधिकारी जयदेव रानडे, कमोडोर उदय भास्कर, अर्थतज्ज्ञ डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांच्यासह रशिया, युरोप, चीन व जपान आदी देशांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. 

‘या परिषदेच्या स्वरूपात या वेळी बदल करण्यात आला आहे. याआधी या परिषदेमधील चर्चासत्रे केवळ निमंत्रित तज्ज्ञांसाठीच राखीव होती; मात्र या वेळी परिषदेची काही सत्रे निवडक अभ्यासक व माध्यमांसाठी खुली असतील,’ असे ‘पीडीएनएस’चे निमंत्रक एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com