दिवाळी धमाका स्टॉलचे बुकिंग जोरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे - बाजारात उत्साह आणि तेजी आणणाऱ्या दिवाळीच्या आनंदपर्वाला सुरवात झाली आहे. सणासुदीच्या या दिवसांत स्वाभाविकपणे खरेदीही जोरकस असते. खरेदीच्या या लाटेवर स्वार होऊन नवे ग्राहक जोडण्याची, व्यवसाय वाढविण्याची इच्छा असणाऱ्या महिला व्यावसायिकांसाठी ‘सकाळ मधुरांगण’ने ‘दिवाळी धमाका’ प्रदर्शन आयोजित केले आहे.

मनोहर मंगल कार्यालय, मेंहदळे गॅरेज, एरंडवणे येथे येत्या रविवारपासून (ता. ८) पासून तीन दिवस होणाऱ्या ‘मधुरांगण दिवाळी धमाका’मध्ये प्रदर्शन, रेसिपी शो, दर्जेदार कार्यक्रम आणि इतर अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असणार आहे. उत्तम प्रतिसादामुळे या प्रदर्शनात सहभागी झालेल्या मागच्या वर्षीच्या बहुतके सर्व स्टॉलधारकांनी स्टॉलची नोंदणी अगोदरच करून ठेवल्याने आता थोडेच स्टॉल शिल्लक आहेत. 

‘सकाळ मधुरांगण’ या प्रदर्शनात विविध प्रांतातील साड्या, ड्रेस मटेरिअल, कुर्ती, पणत्या, आकाश कंदील, दिवाळीचे फराळ, उटणे, रांगोळी, ज्वेलरी, बेडशीट्‌स, पडदे, गिफ्ट आर्टिकल्स, विमा, हेल्थ/ब्युटी प्रॉडक्‍ट, वास्तू, टॅरो कार्ड आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. उपलब्ध स्टॉलची नोंदणी करताना स्टॉलचे शुल्क रोख अथवा क्रेडिट / डेबिट कार्डने भरावे लागेल.

अधिक माहितीसाठी संपर्कः ‘मधुरांगण’ विभाग, सकाळ कार्यालय, दुसरा मजला, ५९५, बुधवार पेठ, शनिवारवाड्याच्या मागे. ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२. (वेळ : स. ११ ते सायं. ६).

Web Title: pune news diwali dhamaka stall booking