श्रोत्यांना मिळाली ‘स्वरभेट’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पुणे - नाट्यगीते, भक्तिगीते, लावणी इथंपासून हिंदी चित्रपटातील गाजलेली जुनी गाणी स्वरातून आणि वादनातून अनुभवताना एक अनोखी ‘स्वरभेट’च मिळाल्याचा आनंद श्रोत्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. या आनंद काना-मनात साठवतच श्रोत्यांची पावले घराकडे वळत होती.

पुणे - नाट्यगीते, भक्तिगीते, लावणी इथंपासून हिंदी चित्रपटातील गाजलेली जुनी गाणी स्वरातून आणि वादनातून अनुभवताना एक अनोखी ‘स्वरभेट’च मिळाल्याचा आनंद श्रोत्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. या आनंद काना-मनात साठवतच श्रोत्यांची पावले घराकडे वळत होती.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पुणे विभाग)च्या वतीने सारसबागेत आयोजित ‘रंगारंग दिवाळी पहाट’ या मैफलीत ही अनुभूती आली. पहाटेचे प्रसन्न वातावरण, हवेत वाढणारा गारवा, पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या श्रोत्यांची गर्दी अशा वातावरणात तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने मैफलीची सुरवात झाली. वेगवेगळी नाट्यगीते, स्फूर्तिगीते सादर करून त्यांनी श्रोत्यांना भारावून टाकले. त्यानंतर आर्य काकडे आणि आर्य अनसलकर यांची ताशा वादनाची जुगलबंदी रंगली.

मैफलीच्या दुसऱ्या टप्प्यात संजीव मेहेंदळे, चित्रा जोशी-आपटे, मिलिंद गुणे, केदार तळणीकर, सचिन वाघमारे, मंदार देव, ऋतुराज कोरे, मंजुश्री ओक, रोहित वांकर या गायक-कलावंतांनी मैफल रंगवली. त्यांनी ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘या सुखांनो या’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘म्यानातून उसळे तलवारीची पात’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘दिस चार झाले मन’ अशी विविध गाणी सादर केली. दरम्यान, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांना महापौर मुक्ता टिळक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दिवाळी पहाट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, शांतिलाल सुरतवाला, अंकुश काकडे, लक्ष्मीकांत खाबिया, रवी चौधरी, रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.

Web Title: pune news diwali festival