गाय-वासरांप्रती कृतज्ञतेसाठी औक्षण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - चौसष्ट योगिनी, अन्नपूर्णेसहित दत्तात्रेयांच्या "प्रसाद पादुकां'चे पूजन, "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...'चा घोष, दत्तात्रेयांस मिष्टान्न भोजनाचा नैवेद्य अन्‌ तिन्ही सांजेला गाय-वासराच्या पायावर दूध आणि पाणी घालून सवाष्णींसहित कुमारिकांनी केलेले औक्षण...गाय-वासरांना पुरणाच्या पोळीचा खाऊ घातलेला नैवेद्य आणि घरोघरी पणत्या उजळून प्रकाशोत्सवाचा प्रारंभ झाला. सोमवारी (ता. 16) गुरुद्वादशी आणि वसुबारसेनिमित्त मठ मंदिरांसह शहरातील अनेक भागांमध्ये गाय-वासरांचे मनोभावे पूजन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

आश्‍विन-कार्तिकातल्या दीपोत्सवाला गुरुद्वादशी आणि वसुबारसेपासून सुरवात झाली. आकाशदिवे आणि पणत्या उजळून दीपोत्सवाचे स्वागत करण्यात आले. गुरुद्वादशी असल्याने दत्तमंदिरांसहित विविध मठांमध्ये दत्तात्रेयांच्या मूर्तीवर अभिषेक, चौसष्ट योगिनींची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. एरंडवणे येथील योगीराज गुळवणी महाराज स्थापित वासुदेव निवास येथे दत्तउपासकांनी संकल्प सोडून योगिनीपूजन केले. अनेकांनी या निमित्ताने दत्तात्रेयांच्या प्रसाद पादुकांचे दर्शन घेतले; तर सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे सायंकाळी नागरिकांना गाय-वासराचे पूजन करता आले. 

कसबा गणपती मंदिर परिसर, सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळ, ब्राह्मण मंगल कार्यालय, निंबाळकर तालीम चौक, बुधवार पेठेत साईनाथ मंडळ ट्रस्ट अशा पुष्कळशा गणेश मंडळांनीदेखील गाय-वासराची व्यवस्था केल्याने नागरिकांना गाय-वासरांचे पूजन करता आले तसेच नैवेद्यही खाऊ घालता आला. 

Web Title: pune news diwali festival vasubaras

टॅग्स