दिवाळीचा पाडवा ‘गोड’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पुणे - जमा- खर्चाच्या वह्या, रोजकीर्द, खतावण्यांचे मुहूर्तावर पूजन... फटाक्‍यांची आतषबाजी अन्‌ कामगारांना भेटवस्तू देत दिवाळीचा पाडवा गोड करण्यासाठी नाना तऱ्हेच्या पूजासाहित्यासह फुले आणि जमा- खर्चाच्या वह्यांच्या खरेदीसाठी व्यापारीवर्गाने आश्‍विन वद्य अमावास्येचा मुहूर्त साधला. बोहरी आळी येथे मुहूर्तावर खरेदी-विक्री होत होती. त्या वेळी बोहरी समाजातर्फे अनेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या, तर जैन मंदिरांतदेखील नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त सजावट करण्यात आली होती; तसेच प्रवचनांचेही नियोजन करण्यात येत होते.  

कार्तिक शुद्ध प्रतिपदेची (बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा) गणना साडेतीन मुहूर्तांमध्ये होते. पाडव्याला नव्या व्यवसायाची सुरवातही केली जाते. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यालादेखील मुहूर्तावरील पूजेसाठी सकाळपासूनच बोहरी आळी येथे व्यापाऱ्यांनी खरेदी केली. वह्यांवर हळद-कुंकू, धणे, अक्षता वाहून लक्ष्मीचे चित्र आणि दिनदर्शिका देऊन बोहरी समाजाचे व्यापारी अन्य व्यापाऱ्यांना जमा- खर्चाच्या वह्यांचा बस्ता लाल रंगाच्या वस्त्रात बांधून देत होते. प्रत्येक दुकानात खरेदी- विक्रीत व्यापारी आणि कर्मचारी व्यग्र होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (ता. १९) सकाळी सहा वाजून ३५ मिनिटे ते सात वाजून ५२ मिनिटे, दुपारी बारा वाजून २४ मिनिटे ते दुपारी तीन वाजून आठ मिनिटे, दुपारी चार वाजून ४५ मिनिटे, सायंकाळी सात वाजून ३५ मिनिटे या मुहूर्तावर अनेकांनी वह्या खरेदी केल्या. 

विक्रेते मुस्तफा घोडनदीवाला म्हणाले, ‘‘सर्वधर्मीय नागरिक श्रद्धेने वह्या खरेदी करतात. आम्ही धणे, अक्षता, हळद- कुंकू वाहून पूजन करतो. आमची सहावी पिढी या व्यवसायात आहे. आम्ही मुस्लिम असलो तरीही श्रद्धेने सर्वधर्मीय नागरिक आवर्जून वह्या खरेदी करायला येतात तेव्हा भारतातील विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणाऱ्या संस्कृतीची प्रचिती  येते.’’

व्यापाऱ्यांसाठी मुहूर्त
व्यापाऱ्यांसाठी दिवाळी पाडव्याचा दिवस महत्त्वाचा असल्याने त्यांनी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर तीन वाजून ३५ मिनिटे ते सकाळी सहा वाजून ३५ मिनिटे किंवा सकाळी आठ वाजून पाच मिनिटांपासून अकरा वाजून पाच मिनिटांपर्यंतच्या सुमुहूर्तावर वहीपूजन करून नवीन वर्षाची सुरवात करावी, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

Web Title: pune news diwali padwa