दमलेल्या बाबाची ही कहाणी... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

हडपसर  - डॉ. सलिल कुलकर्णी यांनी सादर केलेल्या "दमलेल्या बाबाची ही कहाणी', "नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो', "अग्गोबाई ढग्गोबाई', "डिपाडी डिपांग', "मला उड उड झालं', "एकटी एकटी घाबरली ना', "का रे दुरावा', अशा बहारदार सुरेल गीतांमध्ये श्रोते मंत्रमुग्ध झालेले होते. 

निमित्त होते हडपसर मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या धन्वंतरीपूजन आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या वेळी "माझे जगणे होते गाणे' हा डॉ. सलील कुलकर्णी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात दीपोत्सवाने झाली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात हडपसर मेडिकल असोसिएशनचे सभासद व त्यांच्या कुटुंबातील आबालवृद्धांनी दीप उजळले. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन झाले. डॉ. वैभव वनारसे, डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या हस्ते धन्वंतरीपूजन झाले. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक दशरथ जाधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जैन, उपाध्यक्ष डॉ. राहुल झांज्रुर्णे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. शंतनू जगदाळे, सचिव, डॉ. सचिन अबणे, कोशाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. मंगेश बोराटे आणि डॉ रोशनी कावळे यांनी केले.

Web Title: pune news diwali pahat

टॅग्स