"दिवाळी पहाट'मध्ये निरागस सूर भेटीला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - कुठे मंदिरात तर कुठे ऐतिहासिक ठिकाणी... कुठे बागांमध्ये तर कुठे सोसायट्यांमधील सभागृहात "दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफली रंगू लागल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांचे निरागस सूर मैफलींमधून श्रोत्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. या मैफली श्रोत्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहेत. 

पुणे - कुठे मंदिरात तर कुठे ऐतिहासिक ठिकाणी... कुठे बागांमध्ये तर कुठे सोसायट्यांमधील सभागृहात "दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफली रंगू लागल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांचे निरागस सूर मैफलींमधून श्रोत्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. या मैफली श्रोत्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहेत. 

त्रिदल (पुण्यभूषण), रोटरी डिस्ट्रिक्‍ट 3131, कॉसमॉस बॅंक आयोजित "दीप सूर तेजाळती' या "पहाट दिवाळी'मध्ये महेश काळे यांचे सुरेल गायन सादर झाले. महेश यांनी अनुरंजनी रागातील बंदिश, "आधी रचिली पंढरी' असे अभंग गात श्रोत्यांना तृप्त केले. "सूर निरागस हो' या गाजलेल्या गीताने त्यांनी मैफलीची सांगता केली. या गीतात सभागृहातील उपस्थित रसिकांचेही सूर मिसळत गेले आणि मैफल अधिक उंचीवर पोचली. 

या वेळी महापौर मुक्ता टिळक, "रोटरी'चे अभय गाडगीळ, "कॉसमॉस बॅंके'चे मिलिंद काळे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश शहा, "त्रिदल'चे डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. शताब्दी साजऱ्या करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍ट, निवारा वृद्धाश्रम, आनंदाश्रम, लायन्स इंटरनॅशनल या संस्थांचा विशेष गौरव करण्यात आला. 

"मित्रमंडळ सोसायटी'तर्फे आयोजित "दिवाळी पहाट'मध्ये गायक आनंद भाटे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सुरांची मेजवानी श्रोत्यांना मिळाली. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांमुळे अजरामर झालेले "सौभाग्यदा लक्ष्मी...' हे कानडी भजन सादर करून भाटे यांनी श्रोत्यांना स्वरांच्या विश्‍वात तल्लीन केले. ललत रागाचे सौंदर्यही त्यांनी उलगडले. त्यांना माउली टाकळकर (टाळ), भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) यांनी सुरेल साथ केली. रॉयल हार्मोनिका प्रस्तुत "दिवाळी पहाट'मध्ये माउथ ऑर्गनवर विविध गाणी श्रोत्यांना ऐकायला मिळाली. निवारा वृद्धाश्रमात झालेल्या या मैफलीत अनेक वादक सहभागी झाले होते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाला विशेष दाद मिळाली. 

Web Title: pune news diwali pahat