डॉक्‍टरांचे लाक्षणिक उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पुणे - वैद्यकीय क्षेत्रातील विविध मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी "इंडियन मेडिकल असोसिएशन'तर्फे (आयएमए) राष्ट्रीय पातळीवर सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यात "आयएमए'च्या पुणे शाखेतील डॉक्‍टरही सहभागी झाले होते.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्‍न सोडविण्यासाठी 6 जुलै रोजी "आयएमए'तर्फे दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. देशभरातील डॉक्‍टर यात सहभागी झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने डॉक्‍टरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आंतरखातीय समिती स्थापन केली; पण या समितीने दरम्यानच्या काळात कोणतेच काम केले नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याची माहिती "आयएमए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे यांनी दिली.

ते म्हणाले, 'सूर्योदय ते सूर्यास्त असे हे लाक्षणिक उपोषण पुण्यात करण्यात आले. वैद्यकीय व्यावसायिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायदा असावा, अशी एक प्रमुख मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. "गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र' (पीसीपीएनडी) कायद्यात बदल करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी, तसेच "क्‍लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्‍ट'मध्ये दुरुस्तीची मागणी केली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत डॉक्‍टरांना दंड ठोठावताना मर्यादा असणे आवश्‍यक असल्याचीही मागणी करण्यात आली आहे.''

Web Title: pune news doctor fasting