'युवकांचे प्रबोधन करण्यासाठी हा लघुपट निश्चित उपयुक्त'

प्रशांत चवरे
रविवार, 11 मार्च 2018

डिकसळ(ता.इंदापुर) योपल फिल्म प्रस्तुत वेस्टन या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इंदापुर खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष तानाजी सुर्यवंशी, डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे, भिगवणचे माजी सरपंच शंकरराव गायकवाड, अण्णासाहेब धवडे, सुहास गायकवाड, विठ्ठल मस्के, संदीप पाटील, अनंता कुंभार,लघुपटाचे निर्माते विजयकुमार गायकवाड, दिग्दर्शक पंकज यादव, संगितकार रामचंद्र पाचांगणे आदींसह लघुपटातील कलाकार उपस्थित होते

भिगवण - चित्रपट किंवा लघुपट हे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचेही मोठे उपयुक्त साधन आहे. ग्रामीण भागातील समस्यांवर चित्रपट किंवा लघुपटांच्या माध्यमातून भाष्य केल्यास याबाबत मोठी जागृती होण्याची शक्यता असते. डिकसळ(ता.इंदापुर) येथील योपल फिल्मच्या वतीने निर्मिती करण्यात येत असलेल्या वेस्टन हा लघुपट मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या युवकांचे प्रबोधन करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास इंदापुर पंचायत समितीचे सदस्य संजय देहाडे यांनी व्यक्त केला.

डिकसळ(ता.इंदापुर) योपल फिल्म प्रस्तुत वेस्टन या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इंदापुर खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष तानाजी सुर्यवंशी, डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे, भिगवणचे माजी सरपंच शंकरराव गायकवाड, अण्णासाहेब धवडे, सुहास गायकवाड, विठ्ठल मस्के, संदीप पाटील, अनंता कुंभार,लघुपटाचे निर्माते विजयकुमार गायकवाड, दिग्दर्शक पंकज यादव, संगितकार रामचंद्र पाचांगणे आदींसह लघुपटातील कलाकार उपस्थित होते. श्री. देहाडे पुढे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये अनेक कलाकार आहे परंतु त्यांना संधी मिळत नाही. अशा लघुपटांच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांनाही योग्य संधी मिळतील.

लघुपट निर्माते विजयकुमार गायकवाड म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांविषयी प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. अलीकडे मोबाईल हा घराघरामध्ये पोचला आहे त्याचा विधायक वापर झाला पाहिजे परंतु ग्रामीण भागातील तरुण पिढी ही मोबाईलच्या विळख्यात अडकत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे याविषयी प्रबोधन करणाच्या आवश्यकता असल्यानेच वेस्टन या लघुपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली. हा लघुपट तरुण पिढीला विधायक दिशेने घेऊन जाण्यास मदत करेल.  यावेळी शंकरराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. डिकसळ गावांमध्ये पहिल्यांच लघुपटाचे चित्रीकरण होत असल्यामुळे गावांमध्ये जत्रेचे स्वरुप आले होते. प्रास्ताविक दिग्दर्शनक पंकज यादव यांनी केले  सुत्रसंचालन रावसाहेब गवळी यांनी केले तर आभार शशिकांत कुंभार यांनी मानले.

Web Title: pune news documentary