विद्यार्थी मित्रानो, मोठे होऊन तुम्हाला काय बनायच?

युनूस तांबोळी
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): विद्यार्थी मित्रानो, मोठे होऊन तुम्हाला काय बनायच ?...डॅाक्टर, शिक्षक, पोलिस, फौजी, आयपीएस अधिकारी अशी एक ना अनेक उत्तरे मिळत होती. इंग्रजी पथनाट्यातून मुलांचे इंग्रजीवरील पकड, चिमुकल्यांनी गायलेल्या कवीतेतून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात होते. मराठी शाळा देखील स्मार्ट बनत चालली असून, अभ्यासाच्या वेळी अभ्यास तर खेळाच्या वेळी खूप मनापासून खेळा. असा संदेश भारत सरकार मंत्रालयातील माहीती व प्रसारण विभागाचे अप्पर सचीव (परीविक्षीत अधिकारी) डॅा. अभिजीत इचके यांनी दिला.

कवठे येमाई (ता. शिरूर) जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत चौथी पर्यंतेचे शिक्षण घेतलेले युपीएससी परीक्षेत यश मिळविलेले श्री. इचके यांनी पहिल्यांदाच या शाळेला भेट दिली होती. शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी गप्पा मारत बालपणीचा आनंद लुटला. त्यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांनी त्यांच्या बालपणीच्या मराठी शाळेचे किस्से विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी मुख्याध्यापक शोभा बहिरट, शशीकला जगताप, संजय तळोले, बाळासाहेब इचके, शरद भोर, विमल जगताप, सुप्रिया भोर, सरिता दंडवते, आशा शिंदे, आदी विद्यार्थी उपस्थीत होते.

इचके म्हणाले की, अधिकारी बनायचे असेल तर आत्तापासून ध्येय निश्चित करा. ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल बना. प्राथमिक शिक्षणापासूनच उच्चतम शिक्षणाचा पाया बनत असतो. शिक्षणाबरोबर आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी व्यायाम व खेळाला देखील तेवढेच महत्व द्या.

अधिकारी बनन्याची प्रेरणा...
एमबीबीएस ही वैद्यकिय क्षेत्रातील पदवी घेऊन त्यांनी केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशमिळविले. मराठी शाळेतून शिक्षण घेऊन त्यांनी हे यश संपादन केले आहे. शिक्षकांनी दिलेली शिकवण व आई-वडीलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अधिकारी झाल्याचे त्यांनी विद्यार्थ्यासमोर कबूल केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.

Web Title: pune news dr abhijeet echke talking student zp school kawthe yemai