कर्करोगाच्या लढाईत मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - ‘‘जेमतेम नऊ वर्षांचा माझा मुलगा. तो पोहण्यात तरबेज आहे. खरंतर पोहणं हीच त्याची ‘पॅशन.’ संध्याकाळी पोहण्याच्या तलावावरून घरी आल्यावर मसाज करताना पोटात गाठ लागली. पुढच्या काही दिवसांतच ती गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय, हे त्या क्षणी मी अनुभवले...’’

सार्थकची आई सांगत होती. त्या वेळी त्यांच्या आवाजातील कंप जाणवत होता. गेल्या काही वर्षांपासून एकुलत्या एक मुलाने प्रत्येकक्षणी मृत्यूशी अक्षरशः प्राणपणाने दिलेली झुंज त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहात होती. 

‘‘स्वतःला सावरायचे, कधी मनाला समजवायचे तर कधी सार्थकच्या वडिलांना आधार द्यायचा अशी एका बाजूला भावनिक आघाडीवरील लढाई, तर दुसरीकडे उपचारांच्या खर्चाची जुळवाजुळव करण्याच्या लढाईची दुसरी आघाडी. या दोन्ही आघाड्यांवर आम्ही आई-वडील म्हणून दोघंही मागे पडत होतो. खूप खचलो होतो. आशेचा किरणही दिसत नव्हता; पण डॉ. अनंतभूषण रानडे यांच्या रूपाने सुरवातीलाच सार्थकला जगण्याची उमेद देणारे कर्करोग तज्ज्ञ मिळाले. त्यांना ‘डॉक्‍टर डे’च्या निमित्ताने ‘थॅंक्‍यू यू’ म्हणत असल्याची भावना सार्थकच्या आईने व्यक्त केली.

पोहून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्करोगाचे निदान झाले. रक्ताचा कर्करोग चौथ्या टप्प्यावर होता. जगण्याच्या सर्व आशा मावळत चालल्या होत्या; पण सार्थकचा डॉक्‍टरांवर पटकन विश्‍वास बसला. तो उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला. त्यानंतर सार्थक पुढे येऊन आम्हाला सावरू लागला. त्यामुळे कर्करोगाविरुद्धच्या मोहिमेत यशाचा एक-एक टप्पा गाठता आला... आई बोलत होती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून डॉक्‍टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त होत होती.

Web Title: pune news Dr. Ananthabhushan rande story