कर्तव्य, सकारात्मक संस्कारातून गुणवत्तापूर्ण जीवन: डॉ. कुकडे

कर्तव्य, सकारात्मक संस्कारातून गुणवत्तापूर्ण जीवन: डॉ. कुकडे

पुणे: "भारताला उत्तम सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. येथील वातावरण, जीवनशैली आणि अध्यात्माने मानसिक समाधान, आनंद दिले आहे. यातून प्रेरणा घेत गुणवत्तापूर्ण जीवनशैलीसाठी कर्तव्य भावना आणि सकारात्मक संस्कार अंगीकारले पाहिजेत,'' असे मत लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांनी व्यक्त केले.

ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेतर्फे आयोजित "जीवनाची गुणवत्ता ः संकल्पना, मापन व संवर्धन' या संकल्पनेवर आधारित परिसंवादात ते बोलत होते. अभिनेते डॉ. मोहन आगाशे, डॉ. भालचंद्र सहस्रबुद्धे, डॉ. सुजला वाटवे, डॉ. अनघा लवळेकर उपस्थित होते. "क्वालिटी ऑफ लाइफ' या स्मरणिकेचे प्रकाशनही याप्रसंगी झाले.

डॉ. कुकडे म्हणाले, ""आध्यात्मिक साधना हा गुणवत्तापूर्ण जीवनशैलीचा पाया आहे. पंढरपूरच्या वारीला जाणारे हजारो वारकरी कधीही थकत नाहीत, कारण त्यांच्यापाठीमागे आध्यात्मिक शक्ती कार्यरत असते. मनुष्याच्या जडणघडणीसाठी मानसिक समाधान महत्त्वाचे असते. प्रत्येक रुग्ण निराळा असतो. मात्र आपण समाजासाठी काय करू शकतो? मनुष्याला दीर्घायुष्य कसे प्राप्त होईल, याचाही समग्र विचार होणे अपेक्षित आहे.''

डॉ. आगाशे म्हणाले, ""पूर्वी आयुष्य पुरवून पुरवून कसे जगता येईल, असा विचार होत असे. आता आयुष्य पटकन संपवले जाते. जीवनातील हे अनुभव शिकवून जातात. पाठ्यपुस्तक वाचायला वेळ लागतो; पण कादंबरी पटकन वाचून होते. मनुष्य स्वभावही दुसऱ्यावर अवलंबून राहणारा आहे. एखाद्याने शिक्षणासाठी मदत केली, तर तुम्हीही दुसऱ्याला मदत केली पाहिजे. त्यातूनच जीवनाचा आनंद घेता येईल.''
डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ""आपल्याकडे आयुर्वेदापासून अनेक गोष्टी आहेत. गुणवत्तेचे गुणगान नेहमीच गातात; पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास जीवनही सुखकर होईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com